Friday, August 12, 2016 | 8:09:00 AM
तिरंग्यांचा इतिहास
भारताच्या स्वातंत्र्यलढय़ावेळी भारतीयांना सतत प्रेरणा मिळत राहणे आवश्यक होते. त्यासाठी झेंडा हे प्रतीक सवरेत्तम असल्याचे मानले गेले. १९0४ मध्ये स्वामी विवेकानंदांच्या शिष्या भगिनी निवेदिता यांनी प्रथम एक झेंडा बनविला. तो पुढे निवेदितांचा झेंडा म्हणून ओळखला जाऊ लागला २२ ऑगस्ट १९0७ रोजी र्जमनीतील स्टुटगार्ट शहरात भिकाजी कामा यांनी आणखी एक तिरंगा फडकविला. या तिरंग्यामध्ये वरची पट्टी हिरवी, मधली पट्टी भगवी, तर खालची लाल रंगाची होती. यामध्ये हिरवा रंग हा इस्लामचा, तर भगवा रंग हा हिंदू व बौद्ध धर्माचे प्रतीक असल्याचे मानले गेले. हिरव्या पट्टय़ामध्ये असलेली आठ कमळ फुले त्यावेळच्या ब्रिटिश हिंदुस्थानातील आठ प्रांतांची प्रतीके होती. मधल्या पट्टय़ात देवनागरीमध्ये 'वंदे मातरम्' लिहिलेले होते. खालच्या पट्टय़ात एकीकडे चंद्रकोर, तर दुसरीकडे सूर्य होता. भिकाजी कामा, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि श्यामजी कृष्ण वर्मा या तिघांनी हा झेंडा बनविला होता. पहिल्या महायुद्धादरम्यान हा झेंडा 'बर्लिन कमिटी फ्लॅग' म्हणून ओळखला जाऊ लागला. स्वातंत्र्यपूर्वी, स्वतंत्र भारताचा राष्ट्रीय झेंडा काय असावा, याविषयी २३ जून १९४७ रोजी एक समिती स्थापन झाली. १४ जुलै १९४७ रोजी या समितीने सर्वांना मान्य असलेला तिरंगा मान्य केला आणि असा हा भारताचा राष्ट्रीय झेंडा सर्वप्रथम १५ ऑगस्ट १९४७ रोजी फडकविण्यात आला. १५ ऑगस्ट 2016 रोजी त्याला सत्तर वर्षे पूर्ण झाली. एकीचे बळ शिकविणारा, मान ताठ करायला शिकविणारा आणि प्रत्येक भारतीयांचा अभिमान असणारा असा हा तिरंगा आहे.
राष्ट्रध्वज संहिता
माझ्या संदर्भातील तयार केलेले नियम तुम्हाला माहित हवेत. ते आता सांगतो. भारताचा राष्ट्रध्वज समतल तिरंगा असेल. त्याचा आकार आयाताकार असून त्याची लांबी व रूंदीचे प्रमाण 2:३ असे राहील. तीन रंगांच्या पट्ट्या सरळ असतील. सर्वांत वर केशरी, मध्ये पाढंरा आणि खाली हिरव्या रंगाची पट्टी असेल. पांढर्या रंगाच्या पट्टीवर मध्ये सारनाथ येथील अशोकस्तंभावरील चोवीस आर्या असणारे चक्र असेल. त्याचा व्यास पांढर्या रंगाच्या पट्टीच्या रूंदीएवढा असेल. मला तयार करण्यासाठी तयार करण्यासाठीचे वस्त्र खादीचे असेल. सूती, रेशमी वस्त्रही चालेल. पण हे सूत हाताने कातले पाहिजे. चरख्याचा वापर येथे अपेक्षित आहे. शिवण्यासाठी केवळ खादीच्या धाग्यांचा उपयोग होईल. नियमानुसार माझ्यासाठी खादीचा एक वर्ग फूट कपड्याचे वजन २०५ ग्रॅम व्हायला हवे. माझ्यासाठी हाताने तयार केलेल्या खादीचे उत्पादन स्वातंत्र्य सेनानींच्या गरग नावाच्या गावत केले जाते. उत्तर कर्नाटक जिल्ह्यात बंगळूर- पुणे रस्त्यावर हे गाव आहे. येथे या केंद्राची स्थापना १९५४ मध्ये करण्यात आली. मात्र, आता शहाजानपूर येथील ऑर्डिनेन्स क्योरिंग फॅक्टरी, खादी ग्रामोद्योग आयोग व खादी ग्रामोद्योग आयोग दिल्ली येथेही माझे उत्पादन होऊ लागले आहे. माझी निर्मिती खासगी तत्वावरही होऊ शकतो. मात्र, माझा मानसन्मान राखला गेला पाहिजे. त्यासाठी आयएसआय मार्क हवा. माझ्यातील रंगांचे स्वरूप स्पष्ट आहे. केशरी रंग साहस आणि बलिदानाचे, पांढरा सत्य आणि शांतीचे आणि हिरवा रंग श्रद्धा आणि शौर्याचे प्रतीक आहे. चोवीस आर्याचे निळ्या रंगाचे चक्र २४ तास सतत प्रगतीचे प्रतीक आहे. प्रगतीही कशी तर निळ्या अनंत आकाशासारखी किंवा निळ्या अथांग सागरासारखी.
Posted By