Wednesday, August 10, 2016 | 2:53:00 PM
श्रीकृष्णाचा जन्म श्रावण वद्य अष्टमीस मध्यरात्री, रोहिणी नक्षत्रावर चंद्र वृषभ राशीत असतांना झाला. गोकुळाष्टमीला दिवसभर उपवास करून रात्री बारा वाजता पाळण्यातील बाळकृष्णाचा जन्म साजरा करतात व मग प्रसाद घेऊन उपवास सोडतात किंवा दुसर्या दिवशी सकाळी दहीकाल्याचा प्रसाद घेऊन उपवास सोडतात. काला म्हणजे विविध खाद्यपदार्थ, दही, दूध, लोणी एकत्र कालविणे. श्रीकृष्णाने काजमंडळात गायी चारतांना स्वत:ची व सवंगड्यांच्या शिदोर्या एकत्र करून त्यांचा काला केला व सर्वांसह तो खाल्ला. या कथेला अनुसरून पुढे गोकुळाष्टमीच्या दुसर्या दिवशी काला करण्याची व दहीहंडी फोडण्याची प्रथा पडली. दहीहंड्या फोडत दहिकाल्याचा उत्सव साजरा करतात. दुधादह्याची हंडीग्रामदेवते समोर बांधली जाते. तिला झेंडूची फुलं, काकडी, केळीं बांधून सजवली जाते. पुजा, गार्हाणे आटोपल्यावर ती हंडी फोडली जाते. फुटलेल्या हंडीचा काला करून सगळ्यांना वाटला जातो.
Posted By