Friday, April 1, 2016 | 12:36:00 PM
लग्न ……
लग्न काय असत……
लग्न हे मनाच्या रेशीमगाठीचा ऋणानुबंध असत ….
लग्न म्हणजे दोन जीवांचे मधुर मिलन …. दोन आत्म्याच पवित्र मिलन ….
ही साथ असते आयुष्यभराची …. एकमेकांना समजून घेण्याची …..
असं म्हणतात की , घर पहावे बांधून अन लग्न पहावे करून …. अगदी महागाई वगैरे फार असली तरी एकदा लग्न करायला काय जातंय !! :)
विवाह हा स्थिर म्हणजे दीर्घकाळ टिकणारा कसा राहील , त्या योगे घराण्याला स्थैर्य लाभून मागील व पुढील पिढ्यांना व पर्यायाने समाजाला स्थैर्य कसे लाभेल यासाठी धर्मशास्त्रकारांनी अनेक विधी ,नियम आणि कायदे प्रस्थापित केले .
विधी खालीलप्रमाणे:
१. कुंकुमतिलक आणि साखरपुडा : पत्रिका जुळल्या आणि नवरा-नवरींची एकमेकांची पसंती झाली की वधू-वरांच्या कुटुंबीयाकडील लोक लग्न 'पक्के' करण्यासाठी हा विधी करतात. पूर्वी या विधीला 'कुंकू लावणे' म्हणत.
.
२.अंतःपटधारण-मंगलाष्टके : मंगलाष्टके चालू झाल्यावर वधूचा मामा वधूला बोहल्यावर आणतो .अंत:पाट धरल्यावर मुहूर्ताची मंगल वेळ येईपर्यंत सुमारे ५ ते १० मिनिटे मंगलाष्टके गायले जातात . आठ मंगल श्लोक म्हणजे एक अष्टक . या श्लोकात वधूवरांना उपदेश , आशीर्वाद ,शुभेच्छा दिलेल्या असतात .नवग्रह देवता यांची स्तुती असते . मुहूर्त वेळेला अंत:पट दूर केला जातो व प्रथम वधू वराला व नंतर वर वधूला हर घालतो .
3. कन्यादान :हिंदुधर्मशास्त्राप्रमाणे व त्यावर आधारित कायद्यानुसार कन्यादान विधी झाल्याशिवाय विवाहविधी पूर्ण झाला असे मानले जात नाही.
४. होम-हवन : विवाहहोम ही गृहस्थाश्रमाची स्वीकार केल्याची साक्ष होय . या होमात प्रजापतीला आयुष्य प्राप्तीसाठी भूपती ,चंद्र , अग्नी ,इंद्र , वरुण यांना धनासाठी व यम ,धर्माला स्त्री पुरुषांना अकाली मरण येऊ नये म्हणून आहुत्या दिल्या जातात .
५. सप्तपदी :
Posted By Sidd W