लग्नाच्या निमंत्रणाची शोभा वाढवणारे खास मराठी संदेश / उखाणे
♣ विवाह हे दोन जीवांचे, दोन प्रेमाचे आणि दोन अंतःकरणाचे सुंदर मिश्रण आहे.
जेव्हा एक सुंदर प्रेम कहाणी आपल्या पालकांच्या आशीर्वादासह नवीन जीवनास प्रारंभ करते, तेव्हा तें क्षण आनंददायी असतात.
यासाठी आम्ही आपल्याला आणि आपल्या कुटुंबियांना आमचा विवाह सोहळा उत्तम पद्धतीने साजरा करण्यासाठी आमंत्रित करतो.
♣ विश्वा दिली ज्ञानेश्वरी । तुकोबांनी केला संसार पांढरी ।
शिवरायांनी रोवला स्वराज्याचा झेंडा । असा महाराष्ट्र धर्म राजवेडा ।
याच मातीतील अभंग नाती-गोती ।
---------------- आणि ------------- परिवाराकरिता आपल्या अक्षदा पाडाव्यात..
आशीर्वाद असो मान्यवरांचा ! आपलेपणाचे आमंत्रण आमचे आणि आपुलकीचे आगमन तुमचे !
♣ वाट नवी, स्वप्न नवे, स्वप्नाला साथ मिळेल प्रेमाची, जिवनाच्या वाटेवरती साथ मिळेल सुख दुःखाची,
अखंड राहो ऋणानुबंध यांच्या संसारासाठी गरज आहे आपल्या आशीर्वादाची, हिच देवाच्या चरणी प्रार्थना आहे -------------परिवाराची.
आमचे येथे श्री समर्थ जयराम बाबा आणि श्री समर्थ गजानन महाराज कृपेने हे मंगल कार्य करण्याचे योजिले आहे. तरी वधू वरास शुभाशिर्वाद देण्यास येण्याचे करावे.
♣ शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्यमध्ये महाराष्ट्राच्या पावन भूमीत मराठमोळ्या वातावरणात ग्रामदेवतेच्या शितल छायेत व कुलदैवत भवानी देवीच्या आशीर्वादाने मिती मार्गशीर्ष शुद्ध पक्ष एकादशी शुक्रवार दि.२५ डिसेंबर २०२० रोजी सायं.५ वा. १८ मि. या शुभमुहूर्तावर आयोजित करण्यात आलेला आहे, तरी या शुभमंगलप्रसंगी आपण उपस्थित राहून वधू-वरांस शुभाशिर्वाद द्यावेत, ह्या साठीच हे आग्रहाचं निमंत्रण ..!
Marathi wedding card kavita in marathi fonts (मराठी लग्न पत्रिका कविता)
♣ प्रथम पुजावा श्री गणपती । धन्य ती भारतीय संस्कृती ।।
ज्ञानेश्वराने चालवल्या भिंती । अर्जुनाच्या रथावर श्रीकृष्ण सारथी ।।
सर्व काही ईश्वराच्या हाती । तोच जुळवितो नाती - गोती ।।
वधु-वरास आशिर्वाद द्यावेत हीच आमची नम्र विनंती ।।
♣ प्रथम पुजावा श्री गणपती । धन्य ती भारतीय संस्कृती ।। ज्ञानेश्वराने चालवल्या भिंती । अर्जुनाच्या रथावर श्रीकृष्ण सारथी ।। सर्व काही ईश्वराच्या हाती । तोच जुळवितो नाती - गोती ।। वधु-वरास आशिर्वाद द्यावेत हीच आमची नम्र विनंती ।।
♣ श्री दत्त कृपेने व तुलजाईच्या आर्शिवादने हा लग्नसोहका परिपूर्ण करण्याकारिता आपली उपस्थिति वंदनीय आहे, बासाठी हे आमहाचे स्नेह निमंत्रण.
♣ आयुष्याच्या वेलीवारचे हळुवार पान ...
म्हटले तर दोन जिवांना जोडणारा प्रेमाचा धागा ...
म्हटले तर अनेक कुटुंबाना जोडणारा एक स्नेहबंध...
सात जन्माच्या गाठी जुळवणारा हा सोहळा ...
आपल्या शुभेच्या आणि आशीर्वादाशिवाय अपूर्णच ...
म्हणूनच ...
या मंगलप्रसंगी आपली उपस्थिती हवीच
♣ आपला सहभाग क्षणाचा पण आशिर्वाद कायमचा ।या मनस्वी इच्छेने सहपरिवार येऊन नव वधू -वरास शुभशिर्वाद द्यावेत ही नम्र विनंती
lagna patrika format in marathi (लग्न पत्रिका मराठी.)
// श्री गणेशाय नमः //
स. न. वि. वि आमच्या येथे
चि. अक्षय
श्री. गणेश सावंत यांचे जेष्ठ चिरंजीव
रा. चांडोली खुर्द, ता. आंबेगाव, जि .पुणे
चि. सौ. कां. सुनिता
श्री. अरुण पवार यांची जेष्ठ सुकन्या
रा. माणिकदौंडी, ता.पाथर्डी, जि. अहमदनगर
शुभ विवाह मंगळवार दि. ३०/०६/२०२० रोजी दुपारी १.२६ वा.
या शुभमुहूर्तावर आयोजित करण्यात आलेला आहे, तरी या
शुभमंगलप्रसंगी आपण उपस्थित राहून
वधू - वरांस शुभाशिर्वाद द्यावेत, ह्यासाठीच हे आग्रहाचं निमंत्रण ..!
✽ विवाह स्थळ ✽
व्दारका लॉन्स, नगर -कल्याण रोड ,नेप्ती नाका, अहमदनगर.
❉ निमंत्रक ❉
समस्त पवार परिवार आणि आप्तेष्ट
(PH : 91-8888-123456 | 91-8989898989)
To create & download above ecard click here
Click here to customize Marathi ecard